
157.0K
BOपिंपळास ग्रामसभेत गोंधळ! प्रश्नांच्या भीतीने सभा जाणीवपूर्वक रद्द? ग्रामस्थांचा आरोप
📍भिवंडी: प्रतिनिधी
मौजे ग्रामपंचायत पिंपळास येथे आज आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा वादळी ठरण्याआधीच गुंडाळण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केवळ ‘ठराविक सदस्य’ उपस्थित असल्याचे कारण पुढे करत ही ग्रामसभा जाणीवपूर्वक रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळास ग्रामपंचायतीने आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते. गावातील प्रलंबित विकासकामे आणि समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता होती. मात्र, ऐनवेळी सभेला केवळ काही ठराविक सदस्यच उपस्थित असल्याचे कारण देत प्रशासनाने सभा रद्द करण्याची घोषणा केली.
ही सभा रद्द करणे म्हणजे ग्रामस्थांच्या प्रश्नांना बगल देण्याचा आणि जबाबदारीतून पळ काढण्याचा हा पूर्वनियोजित डाव असल्याची चर्चा आता गावात रंगली आहे. कोरम पूर्ण नसल्याचे तांत्रिक कारण दिले जात असले तरी, विरोधक आणि सामान्य ग्रामस्थांना बोलू न देण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभारामुळे पिंपळास गावातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
#bolbalatv #bhiwandi #pimplas #पिंपळास
@bolbalatv










